English

ध्येय / इष्टांक / प्रयोजन / उद्दिष्ट

ध्येय :

इतिहास आणि संस्कॄति जतन करणे हे पुराभिलेख संचालनालयाचे प्रमुख काम.

इष्टांक :

ऐतिहासिक व सांस्कॄतिकदॄष्टया महत्वाचा ठेवा असलेल्या अभिलेखांचे व्यवस्थापन व जतन करणे.

प्रयोजन :
  • शासनाचे निरनिराळे विभाग, मंत्रालयीन विभाग, जिल्हा व तालुका पातळीवरील शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अप्रचलित अभिलेखांचे जतन करण्यासाठी मार्गदर्शन करणे.
  • शासकीय अभिलेखांचे जतन व संवर्धन करून तो अभ्यासकांसाठी उपलब्ध करून देणे.
  • संशोधकांना त्यांच्या मागणीपत्रानुसार अभिलेख उपलब्ध करून देणे.
  • अभिलेखांचे सूक्ष्मचित्रिकरण, संगणकीकरण करणे व त्याच्या छायाप्रती मागणीनुसार पुरविणे.
  • खाजगी व्यक्ति, संस्था, यांचेकडील ऐतिहासिकदॄष्टया महत्वाचा अभिलेख प्राप्त करून त्याचे जतन करणे.
उद्दिष्ट :
  • जिल्हा व तालुका पातळीवरील शासकीय व निमशासकीय अभिलेखांची पाहणी करणे, त्यांचे मूल्यांकन करणे व त्यांना अभिलेख व्यवस्थापन, जतन, सूचीकरण इत्यादीबाबत मार्गदर्शन करणे. ज्या कार्यालयाच्या अभिलेखागारात सुविधा नसतील अशा बाबी शासनाच्या निदर्शनास आणणे.
  • शासनाच्या कार्यालयातील महत्वाचा पण दूर्लक्षित असलेला अभिलेख ताब्यात घेणे.
  • अभिलेख जनतेला सहजी उपलब्ध व्हावा यासाठीच्या नियमांबाबत शासनाला सल्ला देणे.
  • राज्यातील विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, शैक्षणिक संस्थांना त्यांचेकडील ऐतिहासिकदॄष्टया महत्वाच्या अभिलेखांचे जतन करण्याबाबत अवगत करण्यासाठी शासनाला सूचना देणे.
  • राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांतून अभिलेखांचे व्यवस्थापना संदर्भातील महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम 2005 आणि 2007 ची अंमलबजावणी करणे.