English

परिचय

इतिहास आणि संस्कृती जतन करणे हे पुराभिलेख संचालनालयाचे प्रमुख काम. आजतागायत राजकीय, प्रशासनिक, धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक इत्यादी क्षेत्रात ज्या ज्या सुधारणा झाल्या व या क्षेत्रात कसकशी प्रगती होत गेली याबाबतचे समग्र दर्शन पुराभिलेख संचालनालय घडविते. संचालनालयाचे मुख्य कार्यालय मुंबई येथे असून पुणे, कोल्हापूर, नागपूर व औरंगाबाद येथे विभागीय कार्यालये आहेत. पुराभिलेख संचालनालय या नावाने ओळखला जाणारा हा विभाग महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या नियंत्रणाखाली कार्यरत आहे.

अभिलेख हे मुद्दाम तयार होत नाहीत किंवा ते जाणीवपूर्वक निर्माण केले जात नाहीत. ते एखादया कार्याच्या, क्रियेच्या किंवा घटनेच्या अनुषंगाने आपोआपच निर्माण होतात. अभिलेख मानवाच्या गरजेतून निर्माण होतो. तो निर्माण करताना त्याचे महत्त्व लक्षात येत नाही पण काही कालानंतर त्याचे महत्त्व दिसून येते.

अभिलेखागारे किंवा दप्तरखाने हे आता केवळ जुनी दप्तरे संग्रहीत करणारे किंवा जपून ठेवणारे विभाग राहिलेले नाहीत. अभिलेखागारात संग्रहीत केलल्या संदर्भ साधनांचा उल्लेख केल्याशिवाय प्रशासानाची पुढील वाटचाल होणे केवळ अशक्य आहे. सामान्य माणूस आपल्या हक्कासाठी केवळ अभिलेखागारातील संदर्भ साधनांचा वापर करु शकतो.कोणत्याही राष्ट्राचा इतिहास दप्तरखान्यांन शिवाय लिहला जाऊ शकत नाही.आपल्या संस्कृतीचा अमूल्य ठेवा भावी पिढिसाठी जतन करण्याचे बहूमोल कार्य केवळ आपली अभिलेखागारेच करीत आहेत.

पुरालेखागाराची स्थापना

प्रशासक आणि इतिहासाचे अभ्यासक यांचेसाठी अभिलेख जतन करण्याची आवश्यकता असल्याने रेकॉर्ड ऑफिसची स्थापना करण्यात आली . लोकांच्या हक्कासंबंधी व त्यांचे हितसंबंध जपण्यासाठी लवकर व निर्णायक उपाययोजना करण्यासाठी सुप्रीम गव्हर्नमेंटने कलकत्ता येथे एक "जनरल रेकॉर्ड ऑफिस� स्थापन केले व ही हकीकत मुंबई सरकारलाही कळविली. (ऑक्टोबर 1820)| त्याच धर्तीवर मुंबईलाही स्वतंत्र �रेकॉर्ड ऑफिस � निर्माण करण्याची कल्पना निघाली . यास अनुसरून मुंबई प्रांतिक सरकारने 1821 मध्ये "जनरल रेकॉर्ड ऑफिसची" स्थापना केली . विल्यम विसेनक्राफ्ट याची पहिला रेकॉर्ड कीपर म्हणून नेमणूक झाली. हा सर्व दप्तरसंभार प्रथम एलफिन्स्टन सर्कलमधील सेक्रेटरीच्या ऑफीसच्या तळमजल्यावरील जागेत होता. 1829 मध्ये सेक्रेटरीचे ऑफीस अपोलो स्ट्रीटवर सेक्रेटरीएट बिल्डींगमध्ये हलविण्यात आले. �वॉल्यूम्स� च्या संख्येत मोठीच वाढ होऊ लागली. या कागदसंभारासाठी जागा अपूरी पडू लागल्याने 1874 मध्ये नवीन सेक्रेटरीएट (हल्लीचे �जुने� सेक्रेटरीएट) बांधले गेले . रेकॉर्डसाठी पुरेशी जागा या ठिकाणीही नव्हती . पण 1821 नंतरचे रेकॉर्ड लवकर उपलब्ध होण्याच्या सोयीसाठी या इमारतीत आणले गेले . तत्पूर्वीचे रेकॉर्ड पूर्वीच्या जुन्या सेक्रेटरीएटच्या जागेतच ठेवण्यात आले . त्यातल्या काही रेकॉर्डची जवळच असलेल्या मेडिकल स्टोअरच्या जागेत करण्यात आली होती. अशारितीने तीन ठिकाणी विभागले गेलेले हे रेकॉर्ड 1888 मध्ये सध्याच्या इमारतीत एकत्र आणले गेले. सेक्रेटरीएटच्या जवळच गव्हर्नमेंट सेंट्रल प्रेससाठी ही इमारत प्रथम बांधली जात होती. प्रेससाठी चर्नी रोडजवळ जागा देण्यात आली आणि या इमारतीची विभागणी रेकॉर्ड ऑफिस आणि एलफिन्स्टन महाविद्यालय या दोघांमध्ये करण्यात आली .

जागतिक पुराभिलेख दिवस : 9 जून