संदर्भ ग्रंथालय
पुराभिलेख संचालनालयाने स्वत:चे ग्रंथालय उभारले असून जवळपास १२५५६ संदर्भ ग्रंथ उपलब्ध आहेत. यात भारतीय इतिहास विषयक पुस्तके, महनीय व्यक्तिंची चरित्रे, आत्मचरित्रे, प्रवासवर्णने, अभिलेखांतून निवडलेली प्रकाशने, शब्दसूची आणि शब्दकोश, संशोधनात्मक नियतकालिके इ. विषयांवरील ग्रंथसंपदा आहे. यात काही पुस्तके अत्यंत जुनी असून इतर ग्रंथालयात उपलब्ध होण्याची शक्यता नाही. ग्रंथालय फक्त संदर्भासाठीच उपलब्ध असून पुस्तके ग्रंथालयाबाहेर नेण्यास परवानगी नाही.